पुणे : गुन्हे वृत्त

सिमला ऑफिस चौकात ट्रॅव्हल्स बसच्या निष्काळजी धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू; बसचालक फरार, धोकादायक वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Police have registered separate cases and launched investigations into all the incidents across the city.

Police have registered separate cases and launched investigations into all the incidents across the city.

Sakal

Updated on

सिमला ऑफीस चौकात बसच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

पुणे : शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकाजवळ ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत साक्षी चंद्रकांत जगदाळे (वय २०) या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

याप्रकरणी वैभव बाळासाहेब शिंदे (वय २८, रा. मोशी) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वैभव हा पाच जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास त्याची मैत्रीण साक्षी हिच्यासह दुचाकीवरून जात होता. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने धोकादायक वळणावर बस वेगाने व निष्काळजीपणाने चालवून त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने साक्षीचा जागीच मृत्यू झाला. शिवाजीनगर पोलिस आरोपी बसचालकाचा शोध घेत आहेत.

दरम्यान, शिवाजीनगर येथील सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतूक अत्यंत धोकादायक झाली आहे. स.गो. बर्वे चौकातून संचेती चौकाकडे येणारी वाहने भरधाव येतात. त्यावेळी गणेशखिंड रस्त्याने सिमला ऑफीस चौकाजवळ आलेल्या वाहनचालकांना बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या समोरून उजवीकडे वळताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी पोलिस दिसून येत नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com