
पुणे : ‘तुमचं आमचं सेम असतं, प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘हे हे हो हो, होमोफोबिया हॅज टू गो’, ‘नका करू दुजेपणा, समलैंगिकांना आपलं म्हणा’, ‘कल हो आज हो, समानता का राज हो’ अशा घोषणा आणि हातात लहरणारे रंगीबेरंगी झेंडे घेऊन पुणे शहरातील मध्यवर्ती भाग रविवारी (ता. ८) एका वेगळ्याच स्वीकृतीच्या रंगांनी उजळून निघाला.