

Passengers queue up at the MSRTC reservation counter at Pune's Shivajinagar bus depot, where cash payments are required for ticket reservations amid the Diwali rush
esakal
दिवाळीचा सण जवळ आल्याने पुण्यातील नवीन शिवाजीनगर बसस्थानकावर एसटी बसचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, आरक्षणासाठी केवळ रोख रक्कम स्वीकारली जात असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे एसटी महामंडळाकडून एनसीएमसी कार्ड आणि कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे बसस्थानकावरील आरक्षण केंद्रात रोख पैसे देण्याचा आग्रह धरला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.