
जुन्नर : (दत्ता म्हसकर) श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाणाऱ्या पर्यटकांसाठी रोप वे च्या मागणीला राज्य सरकारने प्रतिसाद दिला असून रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे.
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ही मागणी केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींची मागणी पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली असल्याचे डॉ.कोल्हे यांनी सांगितले.जुन्नर पर्यटन तालुका घोषित झाला असल्याने तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि शिवनेरी गडावर शिवजयंती उत्सवासह वर्षभर मोठ्या संख्येने येत असणाऱ्या पर्यटकांसाठी रोपवे ची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. यावेळी गडकरी यांनी राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास पर्वतमाला योजनेंतर्गत निधी मंजूर करण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार डॉ. कोल्हे यांनी राज्याचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची मागणी केली होती.
डॉ. कोल्हे यांच्या मागणी बरोबरच राज्यातील इतर पर्यटन स्थळी रोपवे बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार शिवनेरी गडासह सुमारे बारा पर्यटन स्थळी रोपवे चा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला आहे.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, शिवनेरी गडावर रोपवे बांधल्यास वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, महिला,लहान बालके,दिव्यांग अशा सर्वच स्तरातील शिवभक्त, इतिहास अभ्यासक आदींना गडावर जाण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. रोपवे मुळे जुन्नर तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळेल. तरुणांना रोजगार उपलब्ध होईल व 'डे टुरिझम'कडून स्टे टुरिझम'कडे वाटचाल सोपी होईल. तालुक्याचे अर्थकारण बदलण्यास मदत होईल असा विश्वास खासदार डॉ.कोल्हे यांनी व्यक्त केला असून शिवनेरीचा रोपवे मंजूर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे त्यानी सांगितले.
किल्ले शिवनेरी,जुन्नर, जि. पुणे तसेच अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला जि. रायगड,पन्हाळा (ज्योतिबा) जि. कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक,महाबळेश्वर जि. सातारा,
माथेरान जि. रायगड,जेजुरी जि.पुणे, विशाळगड जि. कोल्हापूर, घोरपुरी (इलेफंटा) जि. रायगड, ब्राह्मगिरी जि. नाशिक, माहूर जि. हिंगोली, व चंद्रेश्वर महादेव मंदिर, चांदवड जि. नाशिक या बारा ठिकाणी रोपवे करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
अलिबाग चौपाटी ते अलिबाग किल्ला जि. रायगड,पन्हाळा (ज्योतिबा) जि. कोल्हापूर, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक,महाबळेश्वर जि. सातारा,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.