Pune: शिवसेना पुणे शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 निखील मालुसरे

शिवसेना पुणे शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखील मालुसरे (वय 28, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, 1053 शुक्रवार पेठ) असे या मुलाचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

निखील यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना लगेच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याबाबत केईएम हॉस्पीटलकडून खडक पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली. त्यांनतर खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हॉस्पीटलकडे दाखल झाले होते. याबाबतची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचे खडक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक यशपाल सुर्यवंशी यांनी सांगितले.

loading image
go to top