Pune News : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर, उपाध्यक्षपदी उमेश शेळके व स्वप्नील शिंदे

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी) यांची, तर उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट उमेश शेळके आणि स्वप्नील शिंदे (महाराष्ट्र टाइम्स) यांची निवड झाली आहे.
Pandurang Sandbhor and Umesh Shelake
Pandurang Sandbhor and Umesh Shelakesakal

पुणे - पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग सांडभोर (दै. पुढारी) यांची, तर उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट उमेश शेळके आणि स्वप्नील शिंदे (महाराष्ट्र टाइम्स) यांची निवड झाली आहे. पत्रकार संघाच्या रविवारी झालेल्या वार्षिक निवडणुकीत ही निवड झाली.

पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी ‘सकाळ’चे छायाचित्रकार शहाजी जाधव यांचीही निवड झाली आहे. इतर पदाधिकाऱ्यांमध्ये सरचिटणीसपदी सुकृत मोकाशी (तरुण भारत), खजिनदार अंजली खमितकर (प्रभात), चिटणीस पूनम काटे-कलापुरे (राष्ट्र संचार), प्रज्ञा केळकर-सिंग (पुढारी) यांची निवड झाली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी हर्ष दुधे, वरद पाठक, श्रद्धा सिदीड (महाराष्ट्र टाइम्स), विक्रांत बेंगळे (आज का आनंद), विजय पुराणिक (पुण्यनगरी), गणेश राख (सामना), संभाजी सोनकांबळे (लोकमत), शंकर कवडे व भाग्यश्री जाधव (पुढारी) यांची निवड झाली आहे. ॲड. प्रताप परदेशी आणि ॲड. स्वप्नील जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com