Pune News : ऑनलाईन उपद्रव शुल्क आकरणीला पर्यटकांचा प्रतिसाद; आठवडाभरात सुमारे सहाशे पर्यटकांनी घेतला लाभ

वन समितीच्या कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होण्यास मदत
pune sinhagad fort entry fees facility to pay online tourist pune tourism forest deparment marathi news
pune sinhagad fort entry fees facility to pay online tourist pune tourism forest deparment marathi newsSakal
Updated on

सिंहगड : सिंहगडावर जाण्यासाठी आकारण्यात येणारे उपद्रव शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा वन विभागाने उपलब्ध करून दिल्याने पर्यटकांची गैरसोय दूर झाली आहे. मागील आठवडाभरात सुमारे सहाशे पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घेतला असून 38,750 रुपये उपद्रव शुल्क याद्वारे जमा झाले आहे.

महत्त्वाचे म्हणजे यामुळे वन समितीच्या कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी झाला असून तपासणी नाक्यावरील गर्दी नियंत्रणात राहत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी दिली आहे. सिंहगडावर जाण्यासाठी वन विभागाकडून केवळ रोख स्वरूपात उपद्रव शुल्क आकारण्यात येत असल्याने अनेक पर्यटकांची गैरसोय होत होती.

याबाबत सकाळ'ने वन विभागाचे लक्ष वेधल्यानंतर मागील आठवड्यात 22 ऑगस्ट पासून उपद्रव शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा वन विभागाने उपलब्ध करून दिली. यामुळे रोख पैसे जवळ नसलेल्या पर्यटकांची गैरसोय दूर झाली असून 22 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2023 दरम्यान सुमारे सहाशे पर्यटकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच या माध्यमातून 38750 रुपये उपद्रव शुल्क जमा झाले आहे.

ऑनलाईन उपद्रव शुल्क आकारणीचे फायदे

•रोख पैसे जवळ नसल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय दूर झाली.

•पैसे भरण्यासाठी पर्याय उपलब्ध झाल्याने तपासणी नाक्यावरील वादविवाद कमी झाले.

•तपासणी नाक्यावर होणारी गर्दी कमी झाली‌.

•कर्मचाऱ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत झाली.

"ऑनलाईन उपद्रव शुल्क भरण्याच्या सुविधेचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. पर्यटकांचा वेळ वाचत असून कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होत आहे. सुट्टीच्या दिवशी तपासणी नाक्यावर उपद्रव शुल्क जमा करण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगा व होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. पुढील काळात उपद्रव शुल्क मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने जमा होईल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत."

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.