

pune accident news
esakal
खडकवासला: सिंहगड घाटात शनिवारी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास दुचाकी संरक्षक कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली तरुणी थेट दरीत कोसळली, तर चालक गंभीर जखमी अवस्थेत कठड्यालगत पडला. वनसमितीच्या स्थानिक सुरक्षारक्षकांच्या तत्परतेमुळे दोघांचेही प्राण वाचले.