

Wild Gaur Trapped in Water Pipeline Area on Pune's Sinhagad Road, Rescue Operation Underway
esakal
Viral Video: पुण्यातील सिंहगड रोड परिसरात एका रानगव्याच्या बचावासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत झाली आहे. सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २८ मधील जनता वसाहत रोड तसेच विश्रांती नगर परिसरात दोन पाण्याच्या पाइपच्या मधील जागेत हा रानगवा अडकल्याची घटना घडली आहे. त्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.