Pune : कोट्यवधींच्या ई-टॉयलेटची मोडतोड

सिंहगड रस्त्यावरील स्थिती; देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेची पाठ
Pune : कोट्यवधींच्या ई-टॉयलेटची मोडतोड
Pune : कोट्यवधींच्या ई-टॉयलेटची मोडतोडsakal

सिंहगड रस्ता : सिंहगड (sinhgad) रस्त्यावरील राजाराम पुलाजवळ असलेले स्वच्छतागृह बंद स्थितीत असून, त्याची मोडतोड झालेली आहे. तसेच स्वच्छतागृह बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे हे स्वच्छतागृह म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा असे झाले आहे. (pune sinhgad area Billions e toilet breakdowns)

राजाराम (rajaram) पुलाजवळील मैलापाणी शुद्धीकरण केंद्राजवळ ई-टॉयलेट उभारण्यात आले आहे. माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या विकासनिधीतून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी ई-टॉयलेट बसवण्यात आली. शहरात अशी एकूण १४ ई-टॉयलेट बसवण्यात आली. मात्र राजाराम पुलाजवळील ई-टॉयलेटसह बहुतांश स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी बसवण्यात आलेले पंखे, दिवे आणि पाणी सध्या बंद आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा खर्च केलेल्या या स्वच्छतागृहांचा वापर किती जणांनी केला, हा संशोधनाचा विषय आहे.

Pune : कोट्यवधींच्या ई-टॉयलेटची मोडतोड
पुणे विद्यापीठात नव्या चार अभ्यासक्रमांना सुरुवात

स्वच्छतागृहाच्या पत्र्यांवर जाहिराती लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह असल्याचे निदर्शनास येत नाही. यासोबतच स्वच्छतागृहांची मोडतोडदेखील झाली आहे. या स्वच्छतागृहांची उभारणी ज्या कंपनीकडून करण्यात आली होती, त्या कंपनीकडे त्याची देखभाल आणि दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. हे स्वच्छतागृह लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नागरिक करत आहे.

Pune : कोट्यवधींच्या ई-टॉयलेटची मोडतोड
कोंढव्यात कोयत्याने वार झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

हे स्वच्छतागृह सुरू करण्यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यासाठी ऑनलाइन तक्रारीदेखील केल्या होत्या. जनतेच्या पैशातून झालेली उधळपट्टी थांबवून लवकरात लवकर ही स्वच्छतागृहे सुरू करावीत.

- अभिजित बारवकर, माजी स्वीकृत सदस्य

सुट्या पैशांची नाणी घालून या स्वच्छतागृहाचा वापर करण्याची सोय करण्यात आली होती. परंतु देखभाल दुरुस्ती न झाल्याने त्याचा वापर करता येत नाही. अज्ञातांनी त्याची मोडतोड केली आहे. या स्वच्छतागृहांचा उपयोग करता येत नाही. हे स्वच्छतागृह असून नसल्यासारखे आहे.

- मंजिरी जोशी, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com