''पुणे स्मार्ट सिटी'' कम्युनिटी फार्मिंगला पुरस्कार

कम्युनिट फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (पीएससीडीसीएल) उत्कृष्टता पुरस्कार (अवॉर्ड ऑफ एक्सलन्स) मिळाला.
Pune-Smart-City
Pune-Smart-CitySakal
Updated on

बालेवाडी - पर्यावरण संवर्धन करण्याबरोबरच शहरातील नागरिकांनाही सामुदायिक शेतीची ओळख व्हावी आणि स्थानिक पातळीवर त्यामध्ये सहभागी होता यावे या उद्देशाने बाणेर येथे साकारलेल्या कम्युनिट फार्मिंग प्रकल्पासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला (पीएससीडीसीएल) उत्कृष्टता पुरस्कार (अवॉर्ड ऑफ एक्सलन्स) मिळाला आहे. इलेट्स इंडिया ट्रान्स्फॉर्मेशन समिटमध्ये 'जमीन वापराचे नियमन' या श्रेणीमध्ये हा पुरस्कार पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांना इलेट्स टेक्नो मीडिया प्रा. ली. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, संपादक व प्रमुख डॉ. रवी गुप्ता यांच्या हस्ते ता.16, सप्टेंबर रोजी ऑनलाईन प्रदान करण्यात आला.

बाणेर सर्व्हे क्रमांक 109 येथे स्थळ सुशोभीकरण (प्लेस मेकिंग) अंतर्गत पुणे स्मार्ट सिटीचा कम्युनिटी फार्मिंग हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध पालेभाज्या लावून शेतकऱ्यांप्रमाणे त्यांचे संगोपन करावे आणि त्याचा लाभ घ्यावा अशी संकल्पना आहे.

Pune-Smart-City
शिवनेरी शिवभक्तांसाठी खुले; पण शिवाई मंदिर राहणार बंदच

"या प्रकल्पामध्ये छोट्या पातळीवर मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर अशा पालेभाज्या लावण्यात येतात.विविध प्रकारची फळं झाडेही लावल्याने या परिसरात थोड्या प्रमाणात हिरवाई होण्यासोबतच आम्हाला व मुलांना सामुदायिक शेतीची संकल्पना कळते आणि त्याचा आनंद घेता येतो. ही चांगली संकल्पना आहे," असे येथील रहिवसी स्मिता खेर यांनी सांगितले.

सीईओ डॉ. संजय कोलते म्हणाले, "पुणे स्मार्ट सिटीच्या वतीने वीसपेक्षा जास्त विविध विषय संकल्पनांवर असे स्थळ सुशोभीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पा मुळे शहरी भागात नागरिकांमध्ये सामूहिक शेती ला उत्तेजना मिळेल, त्या बद्दल आवडही निर्माण होईल.या पुरस्कारामुळे स्मार्ट सिटीला ही प्रोत्साहन मिळाले आहे. असेच इतर हाती घेतलेले प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्यात येतील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com