esakal | पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Smart-City

डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे.

पुणे स्मार्ट सिटीला मिळणार 'डेल'च्या टेक्नॉलॉजीची जोड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाहतूक, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्य आदी क्षेत्रांमध्ये नागरिकांसाठी काम करण्यासाठी 'सेंटर फॉर एक्‍सलन्स'साठी डेल कंपनीबरोबर पुणे स्मार्ट सिटीचा नुकताच सामंजस्य करार झाला. 

पुणे सिटीज मिशनचे संचालक व गृहनिर्माण, शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर; तसेच पंधरा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

डेल कंपनीच्या माध्यमातून नवे तंत्रज्ञान स्मार्ट सिटीला मिळणार आहे. त्यातून वाहतूक व्यवस्थापन, प्रदूषण व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य व शिक्षण या क्षेत्रांत त्या माध्यमातून कार्य होणार आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. 

loading image
go to top