'पुणे स्मार्ट सिटी'च्या माफीनंतर शिवसेना नेत्यांचा राग शांत

shivsena
shivsena
Summary

आक्षेपार्ह ट्विट रिट्विट केल्या प्रकरणी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (pune smart city) लेखी दिलगिरी व्यक्त केलीये.

पुणे- आक्षेपार्ह ट्विट रिट्विट केल्या प्रकरणी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (pune smart city) लेखी दिलगिरी व्यक्त केलीये. त्यानंतर शिवसेनेच्या पुण्यातील नेत्यांचा राग शांत झालाय. तसेच नियोजीत आंदोलनही रद्द झाले. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणारे ट्विट आमदार नितेश राणे यांनी नुकतेच केले होते. हे ट्विट पुणे स्मार्ट सिटीच्या ट्विटर हॅन्डलवरूनही २० मे रोजी रिट्विट करण्यात आले होते. शिवसेना कार्यकर्त्यांना हा प्रकार आवडला नाही. (pune smart city shivsena leaders aaditya thackeray tweet)

पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महापालिकेतील गटनेते आणि पुणे स्मार्ट सिटीचे संचालक पृथ्वीराज सुतार, विभाग प्रमुख प्रवीण डोंगरे, उपविभाग प्रमुख राम बाडुंगे यांनी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याशी संपर्क साधला आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर स्मार्ट सिटीने दिलगिरी व्यक्त करणारे पत्र सुतार यांना दिले. त्यात म्हटले आहे की, ‘स्मार्ट सिटीचा सोशल मिडीया नोएडातील कुटुंब एचआरकडून हॅंडल केले जाते. कंपनीच्या एका कर्मचाऱ्याकडून राजकीय ट्विट रिट्विट करण्यात आले. त्या कर्मचाऱ्याला पुणे स्मार्ट सिटीने कार्यमुक्त केले आहे. तसेच पुन्हा अशी चूक झाल्यास संबंधित कंपनीबरोबर स्मार्ट सिटीने केलेला करार रद्द करण्यात येईल.

shivsena
12 Board Exams: राज्यांकडून सूचना मागितल्या, लवकरच निर्णय

पुणे स्मार्ट सिटीचा सोशल मीडिया आता मुख्य ज्ञान अधिकारी अनिरुद्ध शहापुरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. कंपनीच्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून पुन्हा अशा प्रकारची चूक होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे.’ या बाबत कंपनीचे संचालक पृथ्वीराज सुतार म्हणाले, ‘‘मुळात राजकीय स्वरूपाचे ट्विट स्मार्ट सिटी कंपनीने वापरण्याची गरज नाही. राज्याच्या पर्यावरण व पर्यटन मंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. पुन्हा अशा प्रकारची चूक झाल्यास पुणे स्मार्ट सिटीविरुद्ध तीव्र आंदोलन केले जाईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com