MahaIT Glitch: समाजकल्याण वसतिगृहांच्या प्रवेशाची प्रक्रिया तांत्रिक अडचणींमुळे ठप्प; 'महाआयटी' पोर्टलवरील ओटीपी समस्येमुळे हजारो विद्यार्थी अडचणीत

महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक घोळामुळे समाजकल्याण वसतिगृह प्रवेश ठप्प; ग्रामीण-गरजू विद्यार्थ्यांवर राहण्याचा आर्थिक भुर्दंड, शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ
Pune Municipal Corporation increases monthly food allowance (DBT) for students of Dr. Babasaheb Ambedkar Hostel

Administrative Delays and Financial Burden on Rural Students

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘‘माझ्या मुलाचा पुण्यात नंबर लागला, महाविद्यालय देखील सुरू झालं. पण राहायला वसतिगृहच नाही. आम्ही शेतमजूर, शहरातल्या खासगी रूमचं हजारो रुपयांचं भाडं कुठून भरणार? महिनाभरापासून समाजकल्याण कार्यालयाचे उंबरे झिजवतोय, पण ‘पोर्टल लवकरच सुरू होईल’ यापलीकडे अधिकारी काहीच सांगत नाहीत. निवाराच नसल्याने मुलाला घरीच बसवून ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे.’’ अहिल्यानगरचे हतबल पालक सुनील साळुंके यांची ही उद्विग्न प्रतिक्रिया प्रशासनाच्या गलथान कारभारावर सणसणीत चपराक ओढणारी आहे. महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटला, तरी ‘महाआयटी’च्या पोर्टलवरील तांत्रिक घोळामुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांना अद्याप कुलूपच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com