पळसदेव येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पळसदेव येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published on

पळसदेव, ता. २४ : पुणे-सोलापूर महामार्गावर पळसदेव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत एका भरधाव इलेक्ट्रीक बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पंकज पोपट काळे (वय २६, रा. काळेमत्रेवस्ती, पळसदेव) हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (ता. २४) त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर बस न थांबवता पळून गेलेल्या बस चालकाला इंदापूर पोलिसांनी सरडेवाडी टोलनाक्यावर बससहित ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज काळे हा सोमवारी (ता. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच. ४२ बी. सी. ६४०६) गावातील आठवडे बाजारासाठी जात होता. यावेळी मागून येणाऱ्या ''इका'' कंपनीच्या लाल रंगाच्या इलेक्ट्रीक बसने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पंकज याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पंकज काळे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर बस चालक मदतीसाठी न थांबता बससह घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तपास चक्रे फिरवून बस व चालक बोधिसत्व गजानन गुडदे (वय २४, रा. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास इंदापूर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com