पुण्यात हायवेलगत हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; मराठी तरुणीसह दोघींची सुटका

सावता नवले
Monday, 26 October 2020

पुणे-सोलापूर महामार्गावरील एका  हॉटेलमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे तर 3 महिलांची सुटका केली आहे.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या वेश्या व्यवसाय चालू असणाऱ्या अनुराधा लाॅजवर छापा टाकून पोलिसांनी देहविक्रय करणाऱ्या पश्चिम बंगालच्या दोन तर महाराष्ट्रातील एका तरूणीची सुटका केली. तर या प्रकरणी दोन जणांविरूध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पांढरेवाडी हद्दीतील अनुराधा हाॅटेल व लाॅजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळाली. या माहितीवरून उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या पथकाने संबंधित लाॅजमध्ये बनावट ग्राहक पाठून वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री करून छापा टाकला.  

दरम्यान, या छाप्यात अढळून आलेल्या देहविक्रय करणाऱ्या तीन महिलांची सुटका केली. त्यामध्ये दोन पश्चिम बंगाल तर एक महाराष्ट्रीयन महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी हाॅटेल व लाॅजचालक दिवाकर मधू शेट्टी ( वय 34, रा. उडपी कर्नाटक) व डायसन डेनिस डिसोझा (वय 27) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छापा टाकलेल्या पोलिस पथकामध्ये पोलिस निरीक्षक महाडिक, महिला पोलिस हेमलता सुर्यवंशी,  सचिन बोराडे, अमोल गवळी, धनंजय गावडे, अक्षय घोडके, रवींद्र काळे, राजू शिंदे, सुनील सस्ते यांचा समावेश होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक करीत आहेत. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune solapur highway hotel sex racket busted dound police release 3 young girls at dound