

Luxury Bus Hits Tempo Traveller on Pune Solapur Highway, Three Injured
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर हवेली तालुक्यातील गावच्या हद्दीत भरधाव लक्झरी बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत टेम्पोमधील तीन तृतीयपंथी जखमी झाले असून अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने कुंजीरवाडी येथील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. १६) पहाटे साडेचारच्या सुमारास हॉटेल सत्कार ग्रँड लॉजसमोर हा अपघात घडला.