'सकाळ'च्या बातमीचा परिणाम; भिगवण ते यवत रस्ता झाला सुरक्षित

Pune  Solapur National Highway to Yavat road became safe for riders
Pune Solapur National Highway to Yavat road became safe for riders
Updated on

कुरकुंभ(पुणे) : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या साईटपट्टयांचा मुरूम वाहून गेल्याने रस्ता दुचाकीस्वारांसाठी धोक्याचा बनला आहे या सकाळमधील बातमीची दखल घेऊन संबंधित कंपनीने मुरम टाकण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे काम करताना प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने निष्काळजीपणा व निकृष्टदर्जाचा मातीमिश्रीत मुरूम वापर केला जात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भिगवण ते यवतदरम्यान ठिकठिकाणी साईटपट्टयाचा मुरूम पावसाने वाहून गेल्याने व रस्त्यावर नवीन डांबरखडीचा लेअर टाकला आहे. त्यामुळे रस्त्याला धोकादायक कठडे तयार झाल्याने दुचाकीस्वारांसाठी व लहान चारचाकींसाठी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भातील बातमी 'सकाळ'ने छायाचिञासह 6 ऑक्टोबर 2020ला ऑनलाईन तर 9 तारखेला अंकात प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल घेऊन संबंधित कंपनीने तातडीने साईटपट्टयावर मुरूम टाकण्याचे काम चालू केले.  मात्र, वापरण्यात येणारा मुरूम निकृष्टदर्जाचा लाल व पांढरी मातीमिश्रीत आहे. त्यावर लगेच पाणी मारून रोलींग करण्याची आवश्यक असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दुचाकी मातीमिश्रीत मुरूमात घसरून अपघात होत आहे. तसेच काम करताना सुरक्षेच्यादृष्टीने लांब अंतरापर्यंत बॅरेगेट लावणे, त्या ठिकाणी कामगारांकडे झेंडे देऊन आवश्यक सुचना देणे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या ठिकाणी काम चालू आहे, त्यापासून लांब अंतरावर प्रवाशांच्या लक्षात येईल असे सुचना फलक लावणे. रात्रीच्या वेळी मोठे रिफ्लेक्टरचा वापर करावा. वेगात येणाऱ्या वाहनचालकांना अचानक समोर काम चालू असल्याचे दिसल्यावर वेग कमी करणे शक्य होत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून दुचाकीस्वारांच्या जिवास धोका संभवतो. त्यामुळे संबंधितांनी काम करताना आवश्यक उपाययोजना कराव्या अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात पाटस टोल प्लाझाचे जनसंपर्क अधिकारी वैभव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता काम करतानाची सुरक्षा व मुरूमाबाबत संबंधितांना सुचना दिल्या जातील असे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com