एक डुलकी एक अपघात; चालकास डुलकी लागल्याने बस पलटून एक ठार

या अपघातात अठ्ठावीस प्रवासी जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर.
Accident
AccidentSakal

इंदापूर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरकुटे बुद्रुक ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत लोंढेवस्ती नजीक ज्योती ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीच्या बस चालकास डुलकी लागल्याने बस पलटी होऊन अपघातात एकाचा जागीच मृत्य झाला. मयताची अद्याप ओळख पटली नाही तर बस मधील २८ प्रवासी जखमी झाले. शुक्रवार दि. २१ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. (Pune Solapur Road Accident One Death)

महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.०३-सी.पी.-३७१५ ही स्लीपर कोच ट्रॅव्हल्स मुंबई वरुन अक्कलकोट कडे निघाली होती.इंदापूर तालुक्यात वरकुटे पाटी परिसरात लोंढेवस्ती नजीक बस आलीअसता बसचालकाला डुलकी लागल्याने बस पहिल्या लेन वरुन दुसऱ्या लेनवर जावून दुभाजकाला धडकून पहिल्या लेन वर पलटी झाली.यात एक जण जागीच ठार झाला तर २८प्रवासी जखमी झाले. त्यांना इंदापूर उपजिल्हा,पुणे ससून,सोलापूर शासकीय रुग्णालय व इंदापूर मधील काही खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

Accident
खेड-शिवापूर टोलनाक्यावर 14 लाखांचा गुटखा जप्त

इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्र पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर ,पोलीस हवालदार संतोष काळे, वसंत कदम, तानाजी लोंढे, इंदापूरचे पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर, उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे व सहकारी,एन.एच.आय.व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, स्वर्गीय पै. पांडुरंग रामचंद्र खिलारे गुरुजी प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक नितीन खिलारे, कै. नानासाहेब व्यवहारे प्रतिष्ठानचे रुग्णवाहिका चालक श्री.लोंढे,१०८ रुग्णवाहिका, प्रशांत सिताप,अस्लम शेख,उमेश राऊत,सचिन भिसे या सर्वांनी जखमींना रूग्णालयातदाखल केले.

अपघातात विशाल गायकवाड, लक्ष्मी कासार,सुनिता पवार,सुशिला देवकर, नागा बाई पोवाडे,इशिका बाबर,शांता सुरवसे, परशुराम पुडगे,अरविंद पाटोळे,आनू पवार, राहूल बाबर, नंदा बाबर,अभिजीत पुजारी ( सर्व मुंबई), बळीराम नाईकवाडे, ज्योती गायकवाड, तुळसाबाई हुडगे ( सोलापूर), संतोष गायकवाड, तस्लिम शेख, तौफिक जिगडे, महादेव राजगुरू,इरफान सैय्यद, शांतीलाल काळे, विनय सुर्वे,शबाना शेख, इकबाल शेख ( सर्व मुंबई परिसर),कोमल रासेराव व लखन रासेराव ( सर्व मोहोळ), अमोल राजगुरू,ठाणे हे अपघातात जखमी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com