esakal | पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Sadanand Shetty and Ajit Pawar

पुणे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वारगेट - पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी (Sadanand Shetty) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) जाहीर प्रवेश (Enter) केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. सदानंद शेट्टी यांचे सहर्ष स्वागत केले. त्यांच्या प्रवेशाने शहरात पक्षाला बळ मिळाले असून येत्या काळात संपूर्ण शहर राष्ट्रवादीमय करण्याच्या दिशेने जोमाने काम करू असा विश्वास यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ नेते, माजी महापौर अंकुशकाकडे उपस्थित होते. (Pune Standing Committe Former Chairman Sadanand Shetty Enter in NCP Politics)

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शेट्टी यांनी काँग्रेस मधून भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डात काँग्रेसशी हातातोंडात आलेला विजय भाजपने हिसकावला होता. काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे कमी मतांनी पराभूत झाले होते. शेट्टी हे गेली तीस वर्षे समाजकारण ,राजकारण करीत असल्याने कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार क्षेत्रात प्राबल्य आहे.

हेही वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महिलांसाठी सक्षम करणार; यशोमती ठाकूर

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजाच्या, राज्याच्या विकासाला महत्त्व देणारा पक्ष आहे. म्हणूनच या पक्षाने राज्यात एक स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. येणाऱ्या काळासाठी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार आहे. व पुढील वर्षी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पक्षाची सत्ता कशा प्रकारे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे असे सकाळशी बोलताना शेट्टी यांनी आपले मत मांडले.

loading image