‘सीओईपी’त आजपासून ‘स्टार्टअप फेस्ट’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) आणि भाऊज इंटरप्रेन्युअरशीप सेलतर्फे शनिवार (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आहे. महोत्सवात नवोदित उद्योजक, स्टार्टअप गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

पुणे - कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) आणि भाऊज इंटरप्रेन्युअरशीप सेलतर्फे शनिवार (ता. १५) आणि रविवारी (ता. १६) ‘पुणे स्टार्टअप फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव आहे. महोत्सवात नवोदित उद्योजक, स्टार्टअप गुंतवणूकदार, मार्गदर्शक आणि सर्वसामान्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यंदाचे हे दुसरे वर्षे असून ‘डिस्कव्हरिंग द नोन अननोन’ या संकल्पनेवर यंदाचा महोत्सव आधारित आहे. एकाच छताखाली सात विभागात १३० पेक्षा अधिक स्टार्टअपचा समावेश आहे. दोन दिवसांत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना ऐकण्याची संधी मिळणार आहे. याचा समारोप ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

तसेच मल्टिप्लाय व्हेंचरचे संस्थापक पेटीएम मॉल आणि पेटीएमचे माजी संचालक भूषण पाटील, व्हॅन समूहाचे संस्थापक आणि ओलाचे ज्येष्ठ सल्लागार श्रीनिवास चुंडूरू व पेट्रोनास ल्युब्रिकंट्‌स इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव भणगे मार्गदर्शन करणार आहेत. शंभरपेक्षा जास्त गुंतवणूकदार व मार्गदर्शक येथे येणाऱ्या विविध लघू-उद्योगांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संध्या उपलब्ध करून देतील. इंटर्नशिपची संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.punestartupfest.in/index.html या वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune startup fest from today in COEP