

Fire Breaks Out in Running PMPML Bus in Pune
Sakal
पुणे : पुणे स्टेशनहून निगडीकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मागील बाजूस अचानक आग लागल्याची घटना शिवाजीनगर चौकात घडली. मात्र, रात्रपाळी संपवून घरी निघालेल्या कसबा अग्निशामक केंद्रातील जवान सुरेश पवार यांच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले असून, मोठा अनर्थ टळला.