सोसायट्यांचे बंद ‘एसटीपी’ सुरू करण्यासाठी मोहीम

सोसायट्यांचे बंद ‘एसटीपी’ सुरू करण्यासाठी मोहीम
Published on: 

पुणे, ता. ४ : शहरातील १०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील बंद सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिका दिवाळीनंतर धडक मोहीम राबविणार आहे. पाणीबचतीसाठी हे प्रकल्प अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
यंदा एलनिनोच्या प्रभावामुळे खडकवासला धरण साखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी आहे. शहरावर ओढावणारे पाणीसंकट लक्षात घेता महापालिकेने पाणी बचतीचे धोरण अवलंबले आहे. सध्या आठवड्यातून एक दिवस पाणीकपात सुरू असून, भविष्यात ती वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी महापालिकेने आता सोसायट्यांमधील एसटीपीकडे मोर्चा वळविला आहे.
शहरातील सुमारे ७८० सोसायट्यांमध्ये स्वतःचे एसटीपी प्रकल्प आहेत. मात्र, त्यातील बहुतांश प्रकल्प बंद असल्याने सांडपाणी थेट नाल्यात सोडले जात आहे. बांधकाम नियमावलीनुसार, १०० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या प्रकल्पांना हे प्रकल्प चालवणे बंधनकारक आहे. दिवाळीनंतर महापालिका पथकांमार्फत या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. जे प्रकल्प बंद आढळतील, त्यांना ते तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले जातील, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.

‘‘शहरात सुमारे ७८० सोसायट्यांचे स्वतःचे एसटीपी प्रकल्प आहेत. त्यातील बंद असलेले प्रकल्प सुरू करायला लावू, ही मोहीम दिवाळीनंतर सुरू करू.’’
- पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.