Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Gas Cylinder Shortages Hit Self-Cooking Students: पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर महागाईचा फटका; घरगुती गॅस सिलिंडरची कमतरता आणि खानावळीच्या वाढत्या दरांमुळे अनेक विद्यार्थी आर्थिक तंगीमुळे गावाला परतले आहेत.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: शहरात गॅस सिलिंडरची टंचाई, खानावळीच्या दरांमध्ये झालेली भरघोस वाढ आणि नाश्त्यासह जेवणाचे गगनाला भिडलेले दर, यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. महिन्याचा खर्च दहा हजारांवरून थेट पंधरा हजारांवर गेल्याने अनेक विद्यार्थ्यांनी नाइलाजाने गावाचा रस्ता धरला आहे. परिणामी, ऐन परीक्षेच्या काळात शहरातील अभ्यासिकांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असून, विद्यार्थी आणि अभ्यासिका चालक अशा दोन्ही घटकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com