
पुणे : पुण्यातील इंडस्ट्रीज आणि एसएमईंना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी तसेच बँका आणि उद्योग यांच्यातील संवाद आणखी वाढवत या क्षेत्राच्या आर्थिक गरजा पूर्ण कशा करता येतील यावर पुणे इंडस्ट्रीज ॲण्ड एसएमई समीटमध्ये चर्चा झाली.
उत्पादन क्षेत्राला मदत करीत लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना (एसएमई) आणि निर्यातदारांच्या उन्नतीसाठी ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’, ‘फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन’ आणि ‘महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुणे इंडस्ट्रीज ॲण्ड एसएमई’ समीटचे आयोजन करण्यात आले होते. ‘बडवे ग्रुप ऑफ कंपनी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत बडवे, ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हनुमंत गायकवाड, ‘बँक ऑफ इंडिया’चे महाव्यवस्थापक प्रमोद बाथल, ‘काँक्रोड ग्रुप ऑफ होल्डिंग’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जोसेफ सी. लिबास ज्युनिअर, ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र सर्कलचे महाव्यवस्थापक सुखविंदर कौर, ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे संस्थापक डॉ. संजय चोरडीया, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’चे संस्थापक-अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे आणि संचालक महेशकुमार साळुंखे यावेळी उपस्थित होते. प्रस्ताविक साळुंखे यांनी केले. ते म्हणाले, ‘‘पुण्यातील व्यावसायिक क्षेत्र वाढत आहे. उद्योग व्यवसासाठी असलेल्या सरकारी योजनांची अनेकांना माहिती नसते. ती माहिती देण्यासाठी चेंबर काम करीत आहेत. बँकाशिवाय एसएमई मोठ्या होऊ शकत नाहीत. त्यामुळे बँक हा एसएमईसाठी महत्त्वाच्या पाया आहे.’’
‘‘एसएमईला मदत करण्यासाठी सरकार नियमित विविध योजना आणत आहे. एसएमईला आर्थिक सक्षम करण्यात एसबीआय महत्त्वाचे भूमिका बजावत आहे. या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याची तरतूद आम्ही केली असून आता वेंडरला देखील कर्ज देण्यात येर्इल.’’
-सुखविंदर कौर, महाव्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र सर्कल
‘‘व्यवसाय वाढीसाठी आर्थिक पाठबळ महत्त्वाचे असते. मी ते अनुभवले आहे. कंपनी सुरू ठेवण्यासाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करण्याची तयारी ठेवा. इच्छा असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी योग्य श्रम घेतले तर आपण काहीही करू शकतो.’’
-श्रीकांत बडवे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, बडवे ग्रुप ऑफ कंपनी
बाथल म्हणाले, ‘‘एसएमई देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील एसएमई असून त्यांची संख्या वाढत आहे. सरकारप्रमाणे बँकादेखील एसएमई आणि शेतीवर लक्ष ठेऊन आहोत. या क्षेत्राची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे आमचे लक्ष आहे.’’
-प्रमोद बाथल, महाव्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया
‘‘उद्योग क्षेत्रात चालना देण्यासाठी असा प्रकरणाच्या समीट गरजेच्या आहे. यातून बँक आणि व्यावसायिकांचे नाते आणखी घट्ट होईल. ’’
-जोसेफ सी. लिबास ज्युनिअर, संस्थापक, काँक्रोड ग्रुप ऑफ होर्डिंग
‘‘उद्योगाला चालना देण्यासाठी बँका चांगले काम करीत आहेत. अंगी श्रम आणि चिकाटी असेल तर छोटा व्यवसाय जगभर पोचू शकतो.’’ त्यांचा प्रवास आणि कामाची व्याप्ती यावेळी गायकवाड यांनी मांडली.
-हनुमंत गायकवाड, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, बीव्हीजी इंडिया लिमिटेड
‘‘सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण ठरवलेले सर्व पूर्ण करू शकतो. या प्रवासात भरपूर परिश्रम घ्यावे लागतात. पूर्वी भारतात नावीन्य होते आणि प्रगत देशांत संधी आता. आता भारतातच नावीन्य आणि संधी आहेत. परदेशातील अनेक बड्या कंपन्या आता भारतात येत आहेत.’’
-डॉ. संजय चोरडीया, संस्थापक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील :
उद्योग व्यवसायाच्या बाबतीत महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत खूप पुढे आहेत. त्यात पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. ऑटोमोबाईल, आयटी, बायोटेक असे अनेक क्षेत्र पुण्यात झपाट्याने वाढत आहेत. सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगाला (एमएसएमई) बळ देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यांच्या विकासासाठी आवश्यक बाबी केल्या जात आहेत. या क्षेत्राच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वास सुरवसे यांनी यावेळी व्यावसायिकांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.