

Swargate Underpass Closed for Repairs
Sakal
पुणे : स्वारगेट येथील केशवराव जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग शुक्रवारी (ता. ७) रात्री ११ वाजल्यापासून वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गाची दुरुस्तीची कामे १० नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार असून, तोपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील.