मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी दहा हजार ३२८ पदे उपलब्ध

मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी 
दहा हजार ३२८ पदे उपलब्ध
Published on

पुणे, ता. २२ : ‘‘राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह निवड या प्रकारात पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी १० हजार ३२८ पदे उपलब्ध होणार आहेत. येत्या आठवड्यातच पात्र उमेदवारांची मुलाखतींसाठी शिफारस करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे,’’ अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
पवित्र पोर्टलद्वारे होत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय भरतीमध्ये आतापर्यंत १७ हजार ५०९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यात नियमित फेरीद्वारे १३ हजार ११९, समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी रूपांतरित फेरी राबवून चार हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यातील दोन हजार २४५ जागा संबंधित पात्र उमेदवार न मिळाल्याने अद्यापही रिक्त आहेत. या रिक्त जागांवरील भरतीत उमेदवारांच्या उपलब्धतेचा प्रश्न आहे. त्यामुळे खासगी अनुदानित शाळांमधील मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने आता मुलाखतीसह निवड प्रकाराची प्रक्रिया प्राधान्याने राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागातर्फे घेण्यात आला.

खासगी शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक
सिंह म्हणाले, ‘‘मुलाखतीसह शिक्षक भरती प्रकारात १० हजार ३२८ पदे उपलब्ध होणार आहेत. खासगी अनुदानित शाळांतील रिक्त जागांसाठी उमेदवारांची शिफारस केली जाईल. संबंधित शिक्षण संस्थेला नियुक्तीचा अधिकार असल्याने एका जागेसाठी तीन उमेदवार या प्रमाणात उमेदवारांची शिफारस केली जाईल. संबंधित उमेदवारांची मुलाखत घेऊन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यामुळे येत्या काळात खासगी अनुदानित शाळांना गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com