पुणे: विविध शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: विविध शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

पुणे: विविध शैक्षणिक मागण्यांसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन

तळेगाव ढमढेरे: पुणे येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर विविध शैक्षणिक मागण्यांसाठी "महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ" (फेडरेशन ) तर्फे शासकीय नियमांचे पालन करुन मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक दादासाहेब गवारे, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा स्नेहल बाळसराफ, पुणे शहर अध्यक्ष सुरेश वाघमारे, पिंपरी चिंचवड संघाचे अध्यक्ष योगेश भोसले, प्राचार्य एस. पी. दोरगे, जे. एम. पवार, विवेकानंद शिंदे, दिपक सोंडकर, व्ही. आर. गायकवाड, अर्जुन रावते, सुरेश वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : पाच लाख नागरिकांच्या मोफत लसीकरणाचे ध्येय

यावेळी विवेकानंद शिंदे व स्नेहल बाळसराफ यांनी शैक्षणिक समस्या मांडल्या तसेच दादासाहेब गवारे यांनी विविध मागण्या व धरणे आंदोलना मागिल भूमिका स्पष्ट केली. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यातर्फे उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी संघातर्फे दिलेले निवेदन स्वीकारले.

निवेदनातील प्रमुख मागण्या:

कोरोना काळातील संक्रमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय आर्थिक लाभ व अनुकंपाखाली कायम नोकरी मिळावी, अनुदानासाठी अघोषित शाळा किंवा तुकड्या यांना ताबडतोब अनुदान मिळावे, प्रस्तावित संच मान्यता दुरुस्ती प्रस्ताव दुरुस्त करुन मिळावेत, वैद्यकीय प्रतीपुर्तीसाठी व थकित वेतन बीलासाठी निधी उपलब्ध करावा, सर्व मान्यता प्रस्ताव मंजूर करावेत, कार्यभारानुसार कला व क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या व्हाव्यात, बी.एल.ओ.च्या कामासाठी शिक्षक व शिक्षकेतरांची नेमनुक करण्यात येऊ नये.

पवित्र प्रणाली राबविताना सेवेतील कार्यरत असलेल्या अर्धवेळ शिक्षक कर्मचारी यांना सेवा संरक्षण मिळावे, प्रयोगशाळा सहाय्यक व ग्रंथपाल पदासाठी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करण्यात यावी तसेच केंद्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञांची समिती नियुक्त करण्यात यावी आणि त्यामध्ये १९३६ पासून कार्यरत असलेल्या "महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) या संघटनेस प्रतिनिधित्व देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.

loading image
go to top