

Three-Way Contest in Pune Teachers Constituency as 36 Candidates Remain in the Race
esakal
पुणे: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांनी माघार घेतल्याने आता महायुतीचे कौस्तुभ गावडे, महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आणि उद्योगमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सचिन सानप यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षक मतदारसंघात भाजपला शिवसेनेची समजूत काढण्यात यश आले. शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि सुदर्शना त्रिगुणाईत यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांनीही माघार घेतली. मात्र, उद्योगमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सानप यांनी अद्याप उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे.