

Pune Temperature Increase
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - पावसाळा संपताच पुणेकरांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कडक उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, पारा ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचला आहे. कडक ऊन आणि हवेतील आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यंदा ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली आहे.