esakal | पुणे: औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंटची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंटची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

पुणे: औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंटची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

sakal_logo
By
सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे: बारावी नंतरच्या औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्थापन तंत्रज्ञान आणि सरफेस कोटिंग तंत्रज्ञान या पदविका व्यावसायिक अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्तायादी घोषित करण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा: पुणे: पीएमआरडीएच्या डीपीत महापालिकेने सुचविले बदल

सोमवार (ता.१३) पूर्वी ज्या उमेदवारांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अंतर्गत अर्ज सादर केले आहेत. अशा उमेदवारांचा गुणानुक्रम संबंधित नियम आणि गुणांच्या आधारे निश्चित करण्यात आला आहे. ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवाराने संबंधित तपशील पडताळून घ्यावा. जर त्यात काही चुक असल्यास इ-स्क्रुटणीद्वारे शनिवार (ता.१८) पर्यंत विभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

उमेदवारासाठी सुचना :

- संकेतस्थळावर लॉगइन करून स्वतःच्या नावाची खात्री करावी

- गुणवत्ता यादीतील माहितीत काही चूक असल्यास, ई-स्क्रुटनीद्वारे तक्रार नोंदवावी

- अर्जात खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द केला जाईल

- तक्रार नोंदविण्यासाठी शनिवार (ता.१८) पर्यंत मुदत

अर्जांची संख्या

१) औषधनिर्माणशास्त्र : ७५,५४६

२) हॉटेल व्यवस्थापन व खाद्यपेय व्यवस्थापन तंत्रज्ञान : ६,३८

३) सरफेस कोटिंग तंत्रज्ञान : २१०

संपर्कासाठी क्रमांक :

9028646040 आणि 9699507665 (सकाळी १० ते संध्याकाळी ६)

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

https://posthscdiploma2021.dtemaharashtra.gov.in/StaticPages/HomePage

loading image
go to top