Pune News : मर्जीतील ठेकेदारासाठी महाराष्ट्रात काम केल्याची सक्ती

Tender Issue : पुणे महापालिकेने कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यासाठी १३९.९२ कोटीची निविदा काढली आहे. पण यात जास्त स्पर्धा होऊ नये यासाठी सात वर्ष महाराष्ट्रात काम केल्याचा अनुभव अनिवार्य केला आहे.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेने कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यासाठी १३९.९२ कोटीची निविदा काढली आहे. पण यात जास्त स्पर्धा होऊ नये यासाठी सात वर्ष महाराष्ट्रात काम केल्याचा अनुभव अनिवार्य केला आहे. त्यामुळे राज्यातील ठरावीक एक ते दोन कंपन्या या निविदेसाठी पात्र ठरणार आहेत. यामध्ये स्पर्धाच होणार नाही. राज्यातील एका मंत्र्याच्या जवळच्या एजन्सीचा फायदा करून देण्यासाठी निविदेतील अटी व शर्ती तयार केल्या आहेत. या निविदेच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी याचिकाकर्त्याने वकिलामार्फत महापालिकेला नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com