

Pune School Controversy
sakal
पुणे : शाळेतील शिस्त कायम राखण्याच्या नावाखाली ‘द कल्याणी स्कूल’ने विद्यार्थ्यांचे केस सक्तीने शाळेतच कापले. पालकांकडून केस कापण्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारत शाळेने विद्यार्थ्यांचे केस कापल्याने विद्यार्थी चांगलेच घाबरले असून, पालकांनी नाराजी व्यक्त केली.