
पुणे : कोथरूडमधील पुणे महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात प्रशासनालाच मूषक बंदोबस्ताचा प्रयोग करावा लागला. नाटक सुरू असताना नाट्यरसिकाच्या कपड्यात उंदीर घुसल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने या, तसेच बालगंधर्व रंगमंदिरातही समूळ स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविली.