Pune : गावठाण हद्दवाढीचा विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anti Drone System

Pune : गावठाण हद्दवाढीचा विचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील गावठाणाची पुन्हा एकदा हद्दवाढ होण्याची शक्यता आहे. तसा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू असून त्यासाठी राज्यातील गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचे निष्कर्ष विचारात घेतले जाणार आहेत. त्यानंतरच किती हद्दवाढ करावयाची याचा निर्णय घेण्यात येणार आहेत. हा निर्णय झाल्यास गावठाणबरोबरच त्याच्या लगत असलेल्या वाड्या-वस्त्यांना देखील याचा फायदा होणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक योजनेस राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडून १९९७ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये पाच हजारांच्या आत लोकसंख्या असलेल्या गावांच्या गावठाणाची हद्द दोनशे, तर पाच हजार लोकसंख्येच्या वरील गावांसाठी पाचशे मीटरपर्यंत गावठाणाची हद्द निश्‍चित करण्यात आली होती. ही हद्द निश्‍चित करताना त्यासाठी १९९१च्या लोकसंख्येचा निकष ग्राह्य धरण्यात आला होता. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुणे जिल्ह्यात विकास झाला. त्यामुळे गावांची लोकसंख्या पाच हजाराहून अधिक झाली. परंतु १९९१च्या अटीमुळे गावठाणाची हद्द मर्यादित राहिल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

त्यामुळे गावठाणवाढीसाठी लोकसंख्येचा निकष रद्द करावा, अशा हरकती त्या वेळी दाखल झाल्या त्याचा विचार करून राज्य सरकारने धरत १९९१ च्या लोकसंख्येचा निकष रद्द करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार ज्या गावांचा झोन प्लॅन यापूर्वी झाला आहे, परंतु पाच हजारांच्या आत लोकसंख्या आहे, अशा गावांची गावठाणाची हद्द २०० मीटरवरून पाचशे मीटर. तर पाच हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या गावांची गावठाणाची हद्द पाचशे मीटरहून वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

मध्यंतरी राज्यातील सर्वच गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्याची प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनचा वापर करून मोजणीसही सुरुवात करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सर्व गावांच्या गावठाणाची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर गावठाण हद्दीचे फेररचना करण्याचा विचार राज्य सरकारच्या पातळीवर सुरू आहे.

निवासी हद्दवाढ होणार

बेकायदा बांधकामे नियमित होण्यास मदत

ग्रामपंचायतींचे उत्पन्न

वाढ होण्यास मदत

सातबारा जाऊन

प्रॉपर्टी कार्ड मिळणार

खरेदी- विक्री- कर्ज

आदी घेता येणार आहे

अनेक गावांच्या गावठाण लगत सात ते आठ वाड्या-वस्त्या आहेत

काळाच्या ओघात त्यांचाही मोठा विस्तार झाला आहे

परंतु अद्याप त्यांना गावठाणाचा दर्जा मिळालेला नाही

अनेक गावांच्या गावठाणालगतच्या परिसरात मोठी वाढ झाली

गावठाणच्या हद्दीचे फेरनियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

महसूल परिषदेत देखील चर्चा

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून दुजोरा

ड्रोन सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अचूक माहिती समोर येणार

ते निष्कर्ष विचारात घेऊन किती हद्दवाढ करावयाची यावर निर्णय घेण्यात येणार

loading image
go to top