Pune : पांडव कृषी सेवा केंद्राचे तीनही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव : सात गोदामे सील, विक्री बंदचा आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shop sealed

Pune : पांडव कृषी सेवा केंद्राचे तीनही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव : सात गोदामे सील, विक्री बंदचा आदेश

जुन्नर : पांडव कृषी सेवा केंद्राचे तीनही परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ यांनी दिली.

बोगस बियाणे बाबत पांडव कृषी उद्योग दुकानाची सखोल तपासणी केली असता सात अनधिकृत गोडाऊन आढळून आले. या गोडाऊन मध्ये सुमारे ९५ मेट्रिक टन खताचा साठा तसेच ५७.६९ क्विंटल बियाणे साठा सील करण्यात आला आहे.

दुकानात उपलब्ध असलेल्या बियाणे साठ्या मधून गहू पिकाचे अंकुर केदार, कोहिनूर एचडी २१८९ व हरबरा पिकाचे कोहिनूर दिग्विजय या वाणाचे तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून पांडव कृषी उद्योग यांना पुढील आदेशापर्यंत विक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

पांडव कृषी सेवा केंद्राची तपासणी करत असताना अनेक अनियमिता आढळून आल्या. त्यामध्ये बिलबुक व्यवस्थित न ठेवणे,साधे बीले देणे, बिलावर तपशील न लिहिणे, बिलावर शेतकऱ्यांच्या सह्या न घेणे, दर्शनी भागात खते बियाणे औषधे यांच्या किमती न लावणे तसेच तसेच विक्री करत असलेल्या औषधे बियाणे व खते याचे स्रोत प्रमाणपत्र न ठेवणे त्यामुळे त्यांचे तीनही परवाने रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, ही कारवाई करत असताना पंचायत समितीचे कृषी अधिकारी निलेश बुधवंत लक्ष्मण झांजे कृषी सहाय्यक अमोल मोरे उपस्थित होते.

टॅग्स :Pune Newspune