पुणेः पुण्यात सिंहगड रोडवरील नांदेड सिटी भागात ड्रेनेज लाईनचं खोदकाम सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून तीन कामगार मातीखाली अडकले. या घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिका अग्निशमन विभाग, पीएमआरडीए आणि पीडीआरएफ यांनी घटनास्थळी धाव घेतली..बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आलं. तीनही कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं असून त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. उर्वरित दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. .Kothrud police case: वादग्रस्त पीएसआय प्रेमा पाटील कोण? सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद ते मारहाणीचा आरोप.घटनेमुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. काम काही वेळांसाठी थांबवण्यात आलं असून मृत कामगाराची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.