Pune News: टिंबर मार्केटचा राडारोडा हटवण्यास सुरुवात ;‘जेसीबी’च्या साह्याने स्वच्छता; दुसऱ्या दिवशीही आगीची धग

Pune Timber Market Fire : भवानी पेठेतील टिंबर मार्केटमधील भीषण आगीत ४५ दुकाने, सहा घरे आणि एका वाहनाचे नुकसान झाले असून दुसऱ्या दिवशी जळालेले साहित्य हटवण्यासह नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
Burnt debris being cleared at Pune's Timber Market after a massive fire.

Burnt debris being cleared at Pune's Timber Market after a massive fire.

esakal

Updated on: 

पुणे : भवानी पेठेतील टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीनंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १९) लाकडी साहित्याचा ढिगारा, वाकलेले पत्रे आणि राडारोडा जेसीबी आणि टेम्पोच्या साह्याने उचलण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. दरम्यान, खडक पोलिसांनी आगीच्या घटनेची नोंद केली. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरू असून, नेमके किती नुकसान झाले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Loading content, please wait...