Mulshi Dam Water : मुळशी धरणातून पुण्यासाठी मिळणार ८ टीएमसी पाणी; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, दीड ते दोन वर्षांत पाणी उपलब्ध होणार

पुणे वाढणारी शहराची हद्द आणि लोकसंख्या यामुळे भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आली समोर.
mulshi dam water

mulshi dam water

sakal

Updated on: 

पुणे - पुणे वाढणारी शहराची हद्द आणि लोकसंख्या यामुळे भविष्यात उद्भवू शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता पुणेकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे शहरासाठी मुळशी धरणातून ८ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन पुढील दीड ते दोन वर्षांमध्ये हे अतिरिक्त पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...