
नाशिकची द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे.
पुणे - नाशिकची (Nashik) द्राक्षे, कांदा आता अवघ्या दोन तासांत पुण्याच्या बाजारपेठ (Pune Market) मिळू शकणार आहेत. हे शक्य होणार आहे ते सेमी हायस्पीड रेल्वेमुळे. (High Speed Railway) पुणे-नाशिक या २३५ किलोमीटर लांबीच्या पट्ट्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे.
पुणे आणि नाशिक हा राज्यातील सर्वांत श्रीमंत असा औद्योगिक आणि कृषी पट्टा आहे. या दोन प्रमुख शहरांना हायस्पीड रेल्वेमार्गाने जोडण्यासाठी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) सेमी हायस्पीड रेल्वे उभारणीचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाने नुकताच ग्रीन सिग्नल दिला आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक रस्त्यावरील वाहतूक कमी होण्याबरोबरच वेळ, इंधनाची बचत तसेच प्रदूषण कमी होण्याबरोबरच कृषी व औद्योगिक क्षेत्राला फायदेशीर ठरणार आहे.
या पट्ट्यातील प्रमुख कृषी उत्पादने
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव, मंचर, आळेफाटा येथील भाजीपाला, द्रक्षे, कांदा,फळे व फुले देशाच्या विविध भागांत पाठविली जातात
रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूस पन्नास किलोमीटरच्या परिसरात दूध उत्पादन, भाजीपाला, फळे आणि ऊस या प्राथमिक उत्पादक कंपन्यांना फायदेशीर
मंचर, जुन्नर, संगमनेर, सिन्नर येथे उसावर प्रक्रिया करणारे साखर कारखाने आहेत. त्यांना फायदा होणार
विविध कृषी, दूध प्रक्रिया केंद्र व खाद्य प्रक्रिया उद्योगांना चालना
नाशिकमधील ऊस, कांदा अन्य भागात पाठविणे शक्य होणार
रेल्वेमार्गामुळे होणारे फायदे
शेतकऱ्यांना शेतीमाल बाजार समितीपर्यंत पोचविणे शक्य
माल वाहतूक जलद व कमी दरात होणार
नाशवंत मालासाठी पार्सल व्हॅनची सुविधा
पुण्यासह देशातील बाजारपेठेत माल पाठविण्यासाठी मार्ग उपयोगी ठरणार
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळावर माल पाठविणे शक्य
८० टक्क्यांनी अन्नधान्याच्या वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता
प्रकल्प उभारणीच्या काळात किमान २५ हजार लोकांना रोजगार मिळणार
जमिनींच्या दरात मोठी वाढ होणार
मार्गावर वीस स्थानके
पुणे, हडपसर, मांजरी, वाघोली, आंळदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, साकुर, आंभोरे, संगमनेर, अमोण, नांदूर शिंगोटे, सिन्नर, मोहदरी, वडगाव पिंगला, नाशिक रस्ता.
प्रकल्पासंबंधी
प्रकल्पाचा खर्च १६ हजार कोटी रुपये
पुणे, नगर आणि नाशिकमधील १,४७० हेक्टर जमिनीचे संपादन होणार
त्यापैकी केंद्र व राज्य प्रत्येकी २० टक्के, तर ६० टक्के कर्ज रूपात
भूसंपादन बाजारभावाने व थेट खरेदीने होणार
रेल्वे मार्ग ओलंडण्यासाठी प्रत्येक ७५० मीटर अंतरावर ये-जा करण्याची सुविधा असणार
स्थानके आणि त्यांची वौशिष्ट्ये
चाकण
हे प्रमुख मालवाहतूक भंडार स्थानक असणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला लागून स्थानक असणार
रेल्वे सायडिंग, ऑटोयार्ड, लोडिंग आणि गोदाम सुविधा असणार
राजगुरूनगर
हे स्थानक प्रवासी वाहतुकीसाठी आहे.
विशेष आर्थिक क्षेत्राला हे स्थानक जोडणार
मंचर
बाजार समिती असल्यामुळे प्रवाशांबरोबरच कृषी उत्पादनांची माल वाहतूक सोयीची ठरणार
मंचर ते चिंचोली रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणार
नारायणगाव
कृषी उत्पादने व खासगी माल वाहतूक स्थानक म्हणून विकसित होणार
टॉमेटो, कांदा आणि बटाटा देशाच्या विविध भागात पाठविणे शक्य होणार
स्थानक महामार्गाला जोडले जाणार आहे
संगमनेर
राज्य महामार्गाला जोडणार
दूध उत्पादन, प्रवासी वाहतूक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व भाजीपाला वाहतुकीला चालना मिळणार
सिन्नर
मालवाहतूक भांडार स्थापन केले जाणार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी हे स्थानक फायदेशीर ठरणार
नाशिकरोड
जिल्ह्यातील कृषी उत्पादने देशभर पाठविणे सोयीचे होणार
नाशिक-मनमाड रेल्वे मार्गावर हे स्थानक असणार