
Latest Pune News: शिंदेगाव ( ता.खेड ) येथील संत तुकारामनगरकडे जाणारा रस्ता उकरल्याने नागरिकांची दळणवळणाची गैरसोय होत आहे.त्यामुळे हा रस्ता तात्काळ पूर्ववत करावा अशी मागणी संत तुकारामनगर मधील नागरिकांनी केली आहे.
एमआयडीसी हद्दीपासून संत तुकारामनगरकडे जाण्यासाठी वहिवाटीचा रस्ता आहे.परंतु रस्त्या लगतच्या शेतकऱ्याने हा रस्ता स्वतःच्या जागेत येतो असे सांगत रस्ता खोदाई केली.परिणामी संत तुकारामनगर मध्ये राहणाऱ्या जवळपास ४०० ते ४५० नागरिकांची त्यामुळे गैरसोय झाली.याचा शालेय विद्यार्थी,शेतमाल वाहतूक तसेच कामगार यांना याचाफटका बसत असून त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.