
गोव्यातील वागातोर येथे मंगळवारी (०८ जुलै) सकाळी दहा वाजता एक धक्कादायक घटना घडली. पुण्यातील पर्यटक सुजन चंद्रवदन मेहता याने गेट बंद करण्याच्या किरकोळ वादातून सुरक्षा रक्षक उत्तम दास याला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात उत्तम दास यांचा हात आणि पाय तुटला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे दाखल करण्यात आले आहे. हणजूण पोलिसांनी संशयित सुजन मेहता याला तात्काळ अटक केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.