

Pune: Two more accused have been arrested in connection with the toxic country liquor case that allegedly resulted in the deaths of 21 people in the Hadapsar and Dapodi areas.
Sakal
पुणे : विषारी गावठी दारू प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. विशेष मकोका न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, सखोल तपासासाठी आरोपींची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.