

Father, Brother, Gone: A Family Shattered by Pune Toxic Liquor Tragedy
Esakal
फुगेवाडीतील राठोड कुटुंबावर एकाएकी दु:खाचा मोठा आघात झाला आहे. मुंबई सोडून कष्टाने येथे नवीन जीवन उभारणारे विजय राठोड (३१) आणि राजेंद्र राठोड (३४) हे दोन्ही बंधू पुण्यातील विषारी दारू प्रकरणात एकाचवेळी काळाच्या पडद्याआड गेले. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, घरात शोककळा पसरली आहे. पुण्यात आणि पिंपरीत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.