

Pune traders shut shops to pay tribute to Ajit Pawar
sakal
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील अनेक व्यापारी संघटनानी त्यांच्या सदस्यांची दुकाने आज दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पुणे व्यापारी महासंघातर्फे हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांमध्येही दिवसभर शुकशुकाटाचे वातावरण होते.