Pune Grand Tour 2026
sakal
पुणे - पुणे शहर व जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ या राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेतील प्रोलॉग स्पर्धा सोमवारी (ता. १९) शहरात होणार असून, या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक वळविण्यात येणार आहे.