

Shock on Pune Roads: 110 Accident Black Spots Turn Daily Commute Into a Life Risk
esakal
पुणे, ता. २१ : शहरातील रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असतानाच अपघातांचा धोकाही तीव्र होत चालला आहे. गेल्या तीन वर्षांत शहरात वारंवार अपघात होणारी ११० अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली आहेत. या ठिकाणी मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. वाहतूक पोलिस आणि महापालिका प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.