
पुणे: गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी महाराज चौक ते शिवाजीनगर न्यायालयात दरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरु आहे. पुणे विद्यापीठ चौकामध्ये पोर्टर बीमचे बांधकाम आणि रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयासमोर मेट्रो स्टेशनचे गर्डर लाँचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या बांधकामादरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिस उपयुक्त अमोल झेंडे यांनी दिली.