
शिवणे : शिवणेतील नवभारत हायस्कूल चौकात सकाळी साडे नऊच्या सुमारास झालेली तीव्र वाहतूक कोंडी नागरिकांना अक्षरशः हैराण करणारी ठरली. या चौकात वाहतूक पोलिस नेहमीच असतात, मात्र त्यांचे लक्ष वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहनांची तपासणी करण्यात अधिक असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.