
पुणे : शहरात रस्त्यांवरून भरधाव वेगाने जाणारी अवजड वाहने नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहेत. डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर, कंटेनर अशी अवजड वाहने थैमान घालत आहेत. गेल्या अडीच वर्षांत अवजड वाहनांमुळे २१४ जणांचा मृत्यू, तर १९२ जण गंभीर जखमी झाल्याचे भयावह चित्र समोर आले आहे.